जिथे बंद होतील सारीच दारे
आणि संपतील सगळ्याच वाटा —
तिथेही तू असशील ना.?
जिथे सोडून देतील सावलीही साथ
आणि परका वाटेल धरलेला प्रत्येक हात —
तिथेही तू असशील ना.?
जिथे दुःखाने असेल ग्रासलेली वाट
आणि समस्यांचा असेल पर्वतासमान थाट —
तिथेही तू असशील ना.?
जिथे दिसेनासा होईल कोणताही मार्ग
आणि सोबतीला उरेल केवळ एकाकी एकांत —
तिथेही तू असशील ना.?
जिथे धरणीला लागेल अंबराची आस
आणि काळजात माजेल भावनांचा उन्माद —
तिथेही तू असशील ना.?
– प्रांजल भोईरकर