मराठी माणसा सावध हो जरा
सर्व मिळून तुझ्या भाषेचा कापत आहे गळा
मराठी भाषा बोलायची लोकांना वाटे लाज
इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाखोंची देते लाच
ज्या मातीत जन्म झाला तुझा त्या मातीची शपथ आहे तुला
आता तरी सावध हो मराठी माणसा जरा
जिल्हा परिषद मराठी शाळा ओसाड पडू लागल्या
इंग्रजी शाळा गर्दीने फुलू लागल्या
इकडून तिकडून डोनेशन देऊन पोरगं होते मोठं
अक्षरही त्याला वाचता येत नाही नाणंच निघतं खोटं
शिक्षणाचा सारा खेळ खंडोबा होत चालला रे बा
इंग्रजीमुळे मराठीला अर्थ नाही राहिला रे बा
मराठी माणसा आता तरी सावध हो जरा
तुझ्या हृदयात मराठी भाषेविषयी पाझर फुटू दे जरा
मातृभाषेचा अभिमान बाळगत जा जरा
मराठी माणसा सावध हो जरा
मराठी माणसा सावध हो जरा
– कांचन मिसाळ(तिडके)
मूर्तिजापूर (अकोला)