रनरनत्या उन्हात
माय राबती शेतात
वरी हलक्या नजरेशी
डोळी पाणी भरतात
जळत्या उन्हाळी
तिनं बोडखी वेचली
उन्हाचीये घास
तिने बहुती सोसली
घेउनी पैशाचा भार
कुठे कपासी लावली
आता पांढऱ्या ढगाने
तिची इज्जत मांडली
काळ्या वांझोट्या ढगानं
तिचे रडणे कोलीले
अन् तिच्या मनामधी
‘त्याचे’ स्थान लोपिले
या दु:खाचीये ओझे
तिने मनाशी घेतले
ते मनाचे ओझे
तीज जीवनी बेतले.
– स्वामी बोबडे
पैठणकर
भ्रमणध्वनी : 98813 73162