आला आला श्रावण

आला आला श्रावण 

रंग घेऊनीया आला 

धरतीले हिरवा 

शालू नेसवून दिला !

 

नटविलं अभायाले 

रंगा-रंगाच्या छटांनी

उधळून सप्तरंग 

इंद्रधनू सजविला !

 

धरनिच्या कपारीले

फुटे पाझर पाझर 

असं निर्मळ झऱ्याचं 

दान देऊनीया गेला!

 

मना-मनात उल्हास 

महादेव जागविला 

बैल पोळ्याच्या सणाले 

नंदी राजा सजविला !

 

असा खोळेल श्रावण 

मधुगंधी साठला 

अशा श्रावणी ग बाई

बंधुराया गं भेटला !

प्रा. मोक्षदा विजय बेलखेडे

– मोक्षदा विजय बेलखेडे 

मूर्तिजापूर (अकोला)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top