सोयाबीन जयाले तूर उभी आहे
आत्महत्या अजून दूर उभी आहे
यंदा दुर्वा उगवेल एवढंच पडलं पाणी
पिढ्यापिढ्या कर्ज उरावर उभी आहे
कास्तकार मरून गेला सरणावर निरंतर
मंग करतं मलमपट्टी ही सरकारी खुबी आहे
निसर्ग रोजच करतो जीवघेणी आत्महत्या
तुझ्या-माझ्या दारावर मरण उभी आहे