लेक कस्तुरी

नसला जरी गं तुझ्या बोबड्या शब्दाला अर्थ,

तुझ्याविना होऊन जातं बापाचं आयुष्य व्यर्थ.

बापाची लेक असते ती स्वच्छंद झाडाची सावली,

जन्मभर स्वतःचं आयुष्य वाहते ती माऊली.

नशीबवान तो दरवाजा जिथे उमलते लेकीची कळी,

वंशासाठी नका रे घेऊ त्या बहरत्या वेलीची बळी.

गोजिरवाणी शिष्य कन्या जेव्हा दिसते नजरेसमोरी,

तिच्या हसण्यात रंगते माझी सारी दुनिया न्यारी.

नेहमी मागतो वरदान ईश्वराच्या दारोदारी,

लेक कस्तुरीचे सुगंधी पाऊल पडू दे माझ्या घरी. 

विशाल वानखडे हे एक कवी आहेत.

– विशाल वानखडे 

मूर्तिजापूर (अकोला)

भ्रमणध्वनी – ८३९०३५१४०३

1 thought on “लेक कस्तुरी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top