झोपडीच्या भिंती बदलल्या,
रंगही बदलला l
प्रगतीच्या रस्त्यावर चालताना
प्रेमाला मागे सोडले अन
जिव्हाळ्याचा मार्ग थांबवून टाकला !
यशाच्या शिखराकडे चालता चालता
एकमेकांपासून कधी दूर झालो कळलेच नाही
त्याच्याशिवाय मी नाही आणि माझ्याशिवाय तो नाही ,
तरीही क्षणाक्षणाला एकमेकांचे दोष काढण्याच्या तयारीत सदैव,
कालच्या माझ्या झोपडीत प्रेमाचा समुद्र होता…
आज बंगल्यात काटेरी कुंपणासाठी लागला होता…
एकमेकांच्या आवश्यक गरजा मनाच्या वर वाढल्या होत्या..
छोटा संसार छोटे कुटुंब छोट्या छोट्या समस्या….
बाहेरील समाजसेवा यामध्ये आधीचे समाधान,आपुलकी,प्रेमाचा ओलावा, हे सर्व काही आपोआप दफन झाले…
आताच्या नवीन बंगल्यात बाबाची खाट आवारात आली…
धावता पळता नाश्त्याचा डबा हातात देणाऱ्या आईला शिळ – शीळ करू लागलो
संसाराची दोघांमध्ये
काटेरी कुंपणाचा ढीग लागला होता.
संसाराचे तू तू नेहमी करून टाकली
तू -तू -मी -मी राख रांगोळी करून टाकली.
मागील क्षणाची वाट बघता बघता संपूर्ण प्रेमाची वाट लावून टाकली.
या टेक्निकल दुनियेत प्रेमाच्या दुनियेतून कधी दूर झालो कळलेच नाही
रक्ताच्या नात्याला दूर करून निर्जीव वस्तूला कधी महत्त्व देऊ लागलो हे समजलेच नाही…
– छाया चक्रनारायण
मूर्तिजापूर (अकोला)