असंही एक नातं..!

जगातलं असंही एक नात

ज्याला नाही समजू शकत.

किती ही काहीही झालं,

तरी मिळून राहत.

 

कारल्यासारखा कडूवटपणा आला,

तरी हे नातं दुरावत नाही.

अन् साखरेसारखा गोडवा आला,

तर कधी बोलून दाखवत नाही.

 

सगळ बरोबर असलं,

तर खेळतात पण सोबत.

पण थोडस बिनसलं,

तर चिडवतात पण सोबत.

 

हे नात रुसल,

तर त्यात पण गोडवा असतो.

अन् नात हसलं,

तर आनंद द्विगुणित करतो.

 

हे नातं जगाला,

नेहमी सशक्त दाखवतं.

पण मनाच्या कोपऱ्यात,

एकमेकांची काळजी पण तेवढीच करतं.

 

यांच्याकडे असतो एकमेकांच्या,

गुपित गोष्टींचा मोठा भंडार.

पण वेळ पडल्यावर तोच खुलतो,

आठवणींचा सुंदर दरबार.

 

या नात्यात प्रत्येकाचा,

असतो एक वाटा.

कधी ही होऊ नाही,

देत एकमेकांचा घाटा.

 

एक हरला,

तर पूर्ण नात हरत.

एक जिंकला,

तर पूर्ण नात जिंकत.

 

कधी कधी जवळ असून,

एकमेकांचा विचार करत नाही.

पण दूर असल्यावर,

एकमेकांना पासून करमत पण नाही.

 

एकमेकांची काळजी नसल्याचं,

नाटक करत.

पण एकमेकांना कधी,

कमी ही पडू देत नसत.

 

लोक मस्करीत म्हणत,

टॉम अँड जेरी च नात.

पण रक्षाबंधन साजर करणार,

जगातलं भाऊ – बहिणीच खूप सुंदर हे नातं!

तुषार रडके

– तुषार रडके 

मूर्तिजापूर (अकोला)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top