आली आली हो महागाई पुढे जाण्याची तिला घाई
आज स्वस्त मिळते आहे परंतु उद्या राहणार नाही
महागाईचे जाते सर्वांना दळीते
महागाईचे पिसे सर्वांना छळीते
बारीक दळते खूप छळते मागे काहीच उरत नाही
महागाईच्या जमान्यात कोणी कोणा विचारीना
गरिबीला जाच तशी श्रीमंतीला ठेच
जगायचे कसे चिंता डोकश्यात राही
आली आली महागाई तिने गिळली सस्ताई
गरीब खाई गचांड्या अन् धिटाई खाई मिठाई
महाग झाले पीठ महाग झाले मीठ
शाळा कॉलेज विद्यापीठ तिथे मिळेनाच काही!
थांबेना महागाई नागवली लोकशाही
महागाई सुकू देईना बोटावरची शाई
– सुशील केकान
मूर्तिजापूर,