तू कधी फक्त…..

तू कधी फक्त…

माझ्या पावलांशी बरोबरी केली

कळलेही नाही मला 

दिशानी कशी मुजोरी केली.

सरले कित्येक ऋतू

आला गेला श्रावण

भरले नाही तरीही साधे 

माझ्या ओंजळीतले रीतेपण 

तळहातीच्या रेषा 

सांगती त्यांचे खरेपण

ललाटरेषा लिहिता

 देव विसरला देव पण 

…गायत्री….

चुरगळलेला,

कुठे मोड पडलेला ,

जरासा, कुठे झिजलेला

माझा कागद !!

कोरा नसला तरी शाई उडालेला 

तुझ्या हातात आलाय न

हव ते गाण लिही

जरास पुसट उमटेल 

पण तुझ्या को-या डायरीचा कोरा वास  

त्यात माझा कागद शोभणार नाहीय

तो मुडपून ठेऊन दे

एखाद्या आठवणीच्या खुणे साठी

किंव्हा

एखाद्या सुटलेल्या पण विसरायच्या नसलेल्या पानामध्ये

भरकन तुला पोचता येईल तिथे.

माझ्या चुरगळलेल्या कागदापर्यंत नाही रे …..!!!!

तुझ्या ‘खुणेच्या’ आठवणीशी

पण,कधी ही डायरीही जुनी होईल.

मुळातच माझा जुना कागद अजून जुनकट होईल

मोड पडलेल्या जागी आता तुकडे पडायला लागतील

ठेऊन घेशील सगळे तुकडे

तुझ्या आठवणींचा प्रवास तरी सुखाचा होईल 

….गायत्री….

गायत्री मुळे मराठी साहित्यातील लेखिका.

– गायत्री मुळे

“वेदवास्तु” बडकस चौक, गजानन महाराज मंदिराजवळ, महाल, नागपूर ३२.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top