सीमेवर उभा तो, देशासाठी लढतो
आणि इथे ती घरी, शांत अश्रू लपवते
हातात त्याच्या बंदूक, छातीत धैर्य भरलेलं
तिच्या हृदयात मात्र, नाव त्याच कोरलेलं
रात्रभर जागते ती त्याच्या आठवणीत हरवून
फोनचा एका घंटीसाठी ,
मन तिचं थांबवून
सण उत्सव येतात, पण रंग हरवलेले
त्याच्या शिवाय सारे क्षण, अर्धवट राहिलेले
तिचं हास्य खोटं,
डोळ्यात पाणी दडलेलं
पण देशासाठी त्याग ,
मनात ठाम जपलेलं
लोक म्हणतात, तू सैनिक मोठा आहे
पण त्याच्या मागे उभी ती ,
खरी ताकद आहे.
सीमेवर तो लढतो, गोळ्यांच्या वर्षावात
ती इथे लढते, एकटेपणाच्या सावलीत
दोघांचंही युद्ध वेगळं, पण ध्येय एकच असतं
देशाच्या प्रेमासाठी, जीवन अर्पण होत असतं.
मीनल वानखडे (तायडे)
मूर्तिजापूर
खूप छान मांडणी अनुभव बोलका झाला कवितेतून…. मन आणि जग अंतर्बाह्य संघर्ष मांडला आहे…
धन्यवाद सर 🙏
सैनिकांचा त्याग जितका देशासाठी महत्त्वाचा आहे तितकाच त्यांच्या परिवाराचा आणि विशेषता त्यांच्या पत्नीचा त्याग देशाच्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मॅडम तुमच्या लेखणीतून प्रत्येक सैनिक पत्नीच्या मनातील भावना वाचकांपर्यंत पोहोचल्या आम्ही सैनिकांचे आणि सैनिकांच्या पत्नीचे सदैव ऋणी राहू.
धन्यवाद मॅडम 🙏
सैनिकाची पत्नी ही कुटुंबात खरी सैनिकच असते ,म्हणून ती कुटुंबासाठी सैनिका प्रमाणेच झटते.
धन्यवाद मॅडम 🙏