शोधायला देव देऊळात जातो
अन देवरूपी बापाला घरी माणूस म्हणतो
बापाने मोठ्या हौशीनं चालणं, बोलणं, खेळणं शिकवलं
ह्याला, त्याची किंमतच नाही कळली
कष्ट करून बापानं, जीवाची केली राख रांगोळी
त्याला काय उमजंण, ह्याची साजरी होतंय न छान होळी – दिवाळी
बाप उन्हात सावली, पावसाळ्यात छत्री, थंडीत ऊब बनतो
अन् हा, तुम्ही केलंच काय? असं म्हणतो
पोरं मोठी झाल्यावर सांभाळतील, अशी असते बापाची आस
पण हा उडवून लावतो त्याच बापाची आस
मनगटात जोर नसताना, पोरासाठी बाप जगाशी लढतो
त्याच जगासमोर हा, बापाची लायकी काढतो
कामासाठी तो शहरात जाऊन घरची आठवण पण नाही काढायचा
अन सुन्या घराच्या कोपऱ्यात जाऊन बाप पोराच्या आठवणीत रडायाचा
वेळेचं चक्र फिरलं, मालकाने लायकी काढून काम हिसकून घेतलं
काम नाही, पैसा नाही म्हणून लोकांनी दूर फेकल
हातातून सर्व निसटून गेल्यावर उरला तो नि गर्व
बापाची किंमत नाही केली, ते आज कळलं सर्व
त्याने सगळ्या गावासमोर बापाचे पाय धरून चूक आपली मानली
बापाने मोठ्या आनंदाने घरी नेऊन पुरणपोळी चारली
तो रोज देऊळात जाऊन धन्यवाद म्हणतो
शोधत होता ज्याला, तो देवरूपी बाप घरीच मिळतो.
– प्रा. तुषार रडके
खूप खूप छान आहे प्रयत्न…
खूप खूप धन्यवाद, सर🙂🙏🏻
Best.
Thank you so much ma’am 🙂🙏🏻
“खूपच अप्रतिम! ‘बाप’ या शब्दाची खरी ताकद आणि निस्वार्थ प्रेम तुम्ही या कवितेतून उत्तम प्रकारे मांडले आहे. डोळ्यात पाणी आणणारी आणि वडिलांच्या त्यागाची जाणीव करून देणारी कविता आहे “
तुमच्या प्रेमळ आणि सुंदर शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.🙂 तुम्हाला कविता खूप आवडली हे पाहून मला आनंद झाला.🙏🏻🎉