‘ती’ – माझ जग
कळत नकळत पहिल्यांदा ‘ती’ ला झाला माझा आभास
जन्म होताच माझा, सर्व घरात पसरला आनंद आणि हर्षोल्हास
हाक दिल्यावर पहिल्यांदा ‘ती’ चा आनंद गगनात मावेना
उल्हास बघुन ‘ती’ चा मलाच काही समजेना
पहिला घास ‘ती’ नेच मला मायेन भरवला
चालणं, बोलणं, खेळणं ‘ती’ च्याच मुळे मला मिळाले शिकायला
‘ती’ नेच मला आयुष्याचे चांगले संस्कार दिले
‘ती’ च्याच मुळे संपूर्ण जग बघायला मिळाले
माझे सगळे लाड पुरवणारी ‘ती’
क्षणोक्षणाच्या काळजीने मला सुखरूप ठेवणारी ‘ती’
‘ती’ नेच माझ्या यशासाठी वेळोवेळी देवासमोर प्रार्थना केली
‘ती’ च्याच आशिर्वादामुळे माझे सगळे कामही सफळ झाली
सगळे सण साजरे करणं शिकवणारी ‘ती’
नाते आणि संस्कृती जपायला शिकवणारी ‘ती’
‘ती’ च्या सोबत असताना जग जिंकल्यासारखं वाटायचं
नोकरीसाठी बाहेरगावी गेल्यावर गर्दीत पण एकटं वाटायचं
‘ती’ नेच माझा उत्साह वाढवला जेव्हा दिसलो हरताना
‘ती’ च्याच चरणी सर्वस्व अर्पण करेल जेव्हा दिसेल जिंकताना
मला आनंद होतो ‘ती’ हसल्यावर
रडू पण येत ‘ती’ रडल्यावर
‘ती’ माझ सर्वस्व जग ‘ती’ ला दुसरी उपमाची गरज नाही
‘ती’ म्हणजे दुसरं कुणी नाही तर – “माझी आई”
प्रा. तुषार रडके
Worth reading, absolute beautiful words and emotions
Thank you so much 🙏🏻 I am glad to see that you like the poem.