कवी ग्रेस गेल्यानंतर

 दु:खाच्या महाकवीने 

गाव सुखाचे गाठले 

रसिकही आता सारे 

कसे पोरके जाहले 

 

अभिव्यक्ती सामर्थ्याने 

केली मराठी श्रीमंत 

आशयाची आकाशाशी 

जणू लागली शर्यत 

 

जीवनात कशाचीच 

नाही बाळगली खंत 

म्हणूनच वेडावला 

सारा सारा आसमंत 

 

शब्द ज्याचा प्राण होता 

प्राण गुंतला शब्दात 

सदासर्वकाळ होती 

ज्याच्या वेदना मिठीत

सह संपादक : प्रा.डाॅ.गजानन घोंगटे

प्रा. डॉ. गजानन घोंगटे 

मराठी विभाग प्रमुख,

श्रीमती सांळुकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय,वनोजा,जि.वाशीम-४४४४०२

सदस्य, वाणिज्य भाषा अभ्यास मंडळ, संगाबा अमरावती विद्यापीठ

भ्रमणध्वनी – ९८२२४०६११५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top