समुद्र

समुद्र असतो अथांग

समुद्र किनारी येतात अनेकजण

समुद्रा भोवती शोभून दिसते पर्वत रांग

काही जण करतात प्रेम तर काही चिंतन

समुद्राचे आहे लक्षण   

सर्व प्राणिमात्रांना घेतो सामावून

पाण्यात ठेवत नाही शव एक क्षण  

जल कमी होत नाही घेतले जरी वाटून

 जरी पडत असल्या पर्जन्य धारा

मिळत असल्या येऊन सरिता    

सुटला असला सोसाट्याचा वारा

वेस ओलांडत नाही सर्वांच्या हिता

समुद्रात असतात माणिक मोती

समुद्र आहे खाऱ्या पाण्याचे जलाशय

समुद्रात येवो जहाज अथवा नाव छोटी

वाटत नाही कशाचे भय

समुद्रासारखे मन करावे विशाल

जसे येतात पाण्यावर तरंग  

मनात विचार येतात आणि होतात हाल

योग साधना करून करावा चित्तवृत्तीं चा भंग  

– रोहित तळवलकर 

मुंबई.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top