प्रश्नांच्या मातृभाषेतील मर्मविधान !

कवी डॉ,युवराज सोनटक्के यांचे व त्यांच्या ‘प्रश्नांची मातृभाषा ‘ 

या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मनापासून अभिनंदन करते

.प्रश्नांची मातृभाषा या संग्रहाचा मुख्य विषय आजच्या परिस्थितीत पृथ्वीवरील अन्यायाचे वाढते प्रमाण आहे.यावरची चिंता आणि चीड कवीने मांडली आहे .अन्यायाशी टक्कर घेणारी नैतिक प्रतिकात्मक वादातून प्रश्नांची मातृभाषा हीच भाषा परिवर्तनाची, सामाजिक , राजकीय आर्थिक,धार्मिक या विषयावर ज्वलंत जीवनसमस्यांची सोडवून करण्या-या प्रक्रिया गतिमान करणारी काव्यशैली आहे.

हे काव्य वाचले की माणसाचे मन प्रश्नांची मातृभाषा होते.आपल्याच चुकलेल्या वाटांना आपणच समजून घेऊ शकतो‍ . वाढणारे प्रदूषण हेच पृथ्वीवरचे ग्लेशियर आहे .

पर्यावरण संतुलित,समृद्ध राहावे म्हणून 

सर्वार्थांनी मानव समाजाला दृष्टी देणारा हा काव्यसंग्रह आहे 

 

 .अशी जडवादी तत्त्वचिंतक आंबेडकरवादाची भूमीका या कवितेत मांडली आहे.समताधिष्ठ,न्यायधिष्ठ सर्वंच आंबेडकरी कुटुंबातील सदस्य आहेत.

 

 मातृभाषा हा शब्दच माणसाच्या मूळ प्रश्नांना अन्यायाविरुद्धच्या चिडीला जन्म देतो. हुंकार , गर्जना , विद्रोह आणि स्त्रीवादाचा आक्रोश मांडणारी “माय” ही कविता लेखकांनी आईच्या वेदनांचे सत्यान्वेषी होऊन शब्दबद्ध केले आहे.

 

*मी पोहचलो जीवनाच्या अशा* *क्षितीजापर्यंत जेथून होतो भूतकाळाच्या निष्क्रिय स्मृतीचा अंत!*

 

वर्तमानात जगावे माणसाणे भूतकाळात जगू नये कारण. 

भूतकाळ हा मागे गेलेला असतो.भूतकाळातील घटना परत होऊ नये म्हणून आज मी वर्तमान जगतो .असे कवी सांगतात.म्हणून त्यांची मातृभाषा प्रश्नांची होते.

“प्रश्न विचारणे.प्रश्न पडणे.हीच आपली मातृभाषा आहे.हा विचार यात केंद्रस्थानीआहे. 

प्रश्नांची मातृभाषा,हा संग्रह आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतो.

 

 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि मोरॅलिटीचे पुनर्रचना संदर्भ जोडले आहेत 

 तार्किकतेचा हुंकार घेऊन पृथ्वीचा मूक्या यातनांना काळजाचे डोळे लावून बसलेले सृजनशीलतेचे अन्वयार्थ मांडलेले आहेत.

 वादळाच्या उरातले क्रांतिकारक प्रश्नांचाच मूळपाया अधोरेखित केला आहे.म्हणजेच 

 शिका,संघटित व्हा संघर्ष.आणि आजच्या ज्वलंत प्रश्नांची निर्मिती व्हावी .विवेकबुद्धीने समृद्ध व्हा ,या विचारांची आठवण करून देतो.

 

डाॅ‌ बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार सत्याग्रहाच्या माध्यमातून माणसाला माणूस घडविण्यासाठी केलेले प्रयत्न .आणि त्यामधील झालेली क्रांती हीच आपल्याला माणूसपणात आणते. १९५६चे धम्मचक्र गतीमान करणा-या सर्जनशील धम्म क्रांती संघर्षाला केंद्रस्थानी ठेवून थांबलेल्या वाटा ह्या गगनाशी संवाद करत्या झाल्या.परंतू आजच्या प्रश्नांची उत्तरेही हरवली आहेत.क्रांती ही ओसाड झाली आहे.आईच्याच कुशीतून क्रांतीप्रसवते!आजच्या प्रोटेक्ट वर प्रश्नांची गगनच नक्षंत्रे निर्माण व्हावी.प्रश्नांची क्रांतिमयता 

  “माय ” निर्माण करून मुलांना घडवू शकते”

जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी “म्हणून कवींनी प्रश्नांची मातृभाषा हे शीर्षक ठेवलेले आहे 

 

डॉ, युवराज सोनटक्के सरांचा 

अग्नीशाळा’ कवितासंग्रह २००१ला प्रकाशित झाला.त्यानंतर तब्बल वीस वर्षांनंतर त्यांचा ‘प्रश्नांची मातृभाषा ‘हा प्रकाशित होतो आहे. तसेच त्यांनी गजानन माधव मुक्तीबोधांच्या कवितेवर पुस्तक प्रकाशित केले आहे. बुद्ध तत्त्वज्ञानावरचे दोन ग्रंथ प्रकाशित झाले आहेत हिंदी 

आणि इंग्रजी या विषयावर त्यांचे स्वतःचे चिंतन आहे. 

 आतापर्यंत अनुवादित केलेल्या पुस्तकांची यादी लांबलचक आहे.त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून .तसेच बापावरील कविता प्रसिद्ध आहेत.या वीस वर्षाच्या प्रयोगशाळेत त्यांनी भरपूर साहित्य निर्मिती केली,धम्मबोध घेता घेता , मूलगामी प्रज्ञाशोध घेत आहेत .अभिव्यक्तीच्या मूल्यगामी शैलीतून त्यांनी पृथ्वीचा आक्रोश मांडला आहे.

”प्रश्नाची मातृभाषा’या शीर्षकातून लक्षात येते की मातृत्वाच्या नात्यातले अनुबंध कायम ठेवत ‘माय’ या कवितेतून संपूर्ण स्त्रीजीवनाचा स्त्रीवादच त्यांनी पिसारला . म्हणून 

कवी म्हणतात

“माय तू एकटी रडत होती 

हुंदके देत 

निराशेच्या वनात .

लपवित राहिलीस डोळ्यांतून ओघळणाऱ्या संपृक्त अश्रूंचे जल”

 

आईच्या डोळ्यात संपूर्ण ढगच ओथंबून आलेला असला तरी आईने तो वितळू दिला नाही.त्याला पचवत राहिली ..आईची महिमा गाणारे खूप आहेत .पण आईच्या दु:खाला चिमटीत पकडून व्यक्त होणे . शक्यच नाही

.म्हणून कवी आईचा चेहरा वाचतो.सुरकुत्याच्या जाळ्यात आईच्या वेदनाशी बोलतो पण आई मात्र अबोल राहून दु:ख कष्ट , सारं सारं पचवून घेतो.स्त्रीवादी मनाची घालमेल मधमाशीच्या मोहोळ असलेल्या पोळीसारखी असते.वास्तवांच्या समस्यांनी दंश केलेल्या मधमाशाचे जहाल दंश पचवूनही माय मौन राहते .हे कवीला वेदनामय असाह्य होते.आणि आईच्या सुरकुत्यातून जखमा वाचण्याची शब्दांची कवी किमया करतो.

 

कवी आपल्या आईच्या दु:खवेदना ऐकण्याचा प्रयत्न करतात पण माय आपल्या वेदनांना ओठात मौन करीत राहीली प्रचंड बलशाली होऊन संपूर्ण संसाराचा भार खेचत राहिली आहे प्रश्नांची मातृभाषा !

माय या कवितेत म्हणतात

 

“जळत्या भट्टीचे निवासस्थान झालेल्या तुझ्या आयुष्यात अग्नीच्या ज्वाळा खेळत राहिल्या लपंडाव कोणत्याही शब्द गाजवू शकला नाही तुझ्यावर अधिकार !”

दु:ख व आसवे

शोषून घेतले समुद्रासारखे काही न बोलता 

तू राहिलीस मौन व असह्याय तुझ्या बंद ओठांचे बोल ऐकण्याचा प्रयत्न करीत राहिलो माय!”

 

आईच्या कष्टांचं चीज झालं मूके शब्द मौन झालेले मन जगासमोर कवितेतून आईची महती मुलांने मांडलेली व्यथा एका आईची नसून संपूर्ण जागतिक आईच्या दु:खाचा आरोह मांडला जणू कवीने.

 हेच धन मायरूपी महासत्याचं होत 

“माय ” ही कविता , आईच्या दु:खाशी समर्पित होते.तिच्या त्यागाचा महिमा वेचते .तरीही तो त्याग व्यक्त होत नाही . मुलांसाठी घेतलेल्या कष्टाचं जाळ्यात स्वतः “माय ,एकटीच आहे.आणि 

  आईच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या मौनधारण करून आहेत.आयुष्याचं अगणित दुःखाची वेदना मांडतात. कवीच्या सामाजिक प्रश्नांची मातृभाषा हीच विचारप्रज्ञा वावरात प्रश्नांची मातृभाषा पेरली.

आणि त्यांचे उत्तर आजचे भयानक वास्तव समोर आले. पेरावे तसे उगवते‌ हेच सत्य किती तंतोतंत खरे आहे.

 

” प्रतिभेचे वावर पडीक ठेवले नाही .तर सत्यान्वेषाची तार्किकता सृजनशीलतेतून पृथ्वीची कैफियत मांडली ‌हीच प्रश्नांची मातृभाषा वैश्विक प्रश्न होत गेली आहे , पर्यावरणाची हीच पेरली आहे‌. ही पेरणी म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादाची अन्वयार्थ घेऊन आपल्या पंखाची गती वाढविण्यासाठी “माय” आरक्त ओठांची पहाट होत सज्ज होत आहे.

 

पदार्थविज्ञानात ते बेंगलुरु येथे कार्यरत आहेत. एम ,एस्सी,आहेत.हिंदी साहित्यात त्यांनी एम,ए, आणि पीएच,डी,केलेली आहे.आणि त्यांची मातृभाषा मराठी आहे.हिंदी, आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन आणि अनुवाद करतात.आतापर्यंत बरेच साहित्य त्यांनी अनुवादित केलेले आहे.

पदार्थविज्ञानाचे शास्त्रज्ञ असलेलं. डॉ.युवराज सोनटक्के सरांवर आईच्या काळजातली भाषा उमटली आहे.स्त्रियांचे दु:ख, म्हणजे काय 

असतं हे मांडताना त्यांनी या पृथ्वीलाच माय म्हणून तिला पडलेले प्रश्न मांडले .मग या पृथ्वीवरील मातृभाषाचे प्रश्न , प्रश्नांची मातृभाषा असे चिंतनशील ,विश्वसाहित्यात प्रश्नांची मातृभाषा घेऊन थेट प्रवेश करतात. मातृभाषेतून त्या भाषेचे सौंदर्य हे क्रांतिदर्शी असल्यामुळे त्यांच्या कवितेत असलेले प्रश्न . वाचकांना अंतर्मुख करतात.सरांच्या कविता नुसत शब्दांचा खेळ नाही तर इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारात ,

डॉ,युवराज सोनटक्के यांचा ‘प्रश्नांची मातृभाषा’हा काव्यसंग्रह केवळ कविताचा संग्रह नसून ,आजच्या विदीर्ण झालेल्या समाजमनाची डायरी आहे.शीर्षकच कवीचा अजेंडा स्पष्ट करत .ही कविता सौंदर्यासाठी नाही ,तर प्रश्नांसाठी आहे.प्रश्नाचे पडघम संपूर्ण काव्यसंग्रहातून व्यक्त होतात,आणि प्रश्नांची मातृभाषा कोणती तर माणसाला माणूस म्हणून जगू न देणाऱ्या व्यवस्थेला विचारले प्रश्न म्हणजेच प्रश्नांची मातृभाषा!

या संग्रहाचे ३ मुख्य प्रवाह लक्ष वेधून घेतात पहिला प्रवाह म्हणजेआंबेडकरी अस्मिता विचार,अग्राह्य मनुच्या विध्वंसक आयुधांच्या लाटा .

 बाबासाहेब आंबेडकरांनी कोरल्या भवितव्याच्या अथक वाटा”या ओळीतून कवी जातीयव्यवस्थेला हजारो वर्षांच्या क्रौर्याला आणि संविधानाने दिलेल्या आशादायी वाटेला एकत्र आणतो , बाबासाहेब म्हणजे केवळ व्यक्ती नाहीत.तर कवीसाठी ते मुक्तीचे प्रतीक आहे.

 

“धरतीच्या देहाचे ग्लेशियर वितळण्यासाठी तिच्या संकल्पित वक्षावर का होते बळजोरी?

या कवितेत कवीने धरतीला स्त्रीचं रूप दिलयं इथे.ग्लेशियर म्हणजे बर्फाची नदी.तापमान इतकं वाढलं की .जे आईच्या पान्हासारखं स्वच्छ निळसर पाणि सुद्धा तापमानान वितळून पूर व्हायला लागलं .जसे आईच्या मृत्यूदेहावर मुलांनी पान्हा चाखावा मुलाने हंबरडा फोडून आईच्या मृत्यूनंतर जगाला प्रश्न करावेत.अगदी तेच प्रश्न कवी प्रश्नांची मातृभाषा मधून जगाला प्रश्न करतात .आपण धरतीच्या छातीवर अत्याचार का करतोय? निर्सगाची हेळसांड का करतोय.?

आज धरतीवर सूर्य नुसता आग ओकतोय,हे मानवीसंकटाची चाहूल निर्माण करणारे मानवच पशुत्वा सारखं का वागतात.?

नाशिकच्या तपोवन भागात

साधुग्राम’, बनविण्यासाठी .१लाख ७०० झाडे तोडलीत .मंत्री गिरीश महाजन म्हणाले की ,१,८००पेक्षा जास्त झाडे कापावी लागतील.सर्वंच मूकझाले कुणाचीही प्रश्न विचारायची हिम्मत नाही.परंतू ही प्रश्नांची मातृभाषा आता प्रश्न करत आहे..आपण हे थांबवलं पाहिजे.!

कुंभमेळासाठी कितीतरी हेक्टरवरचे वृक्षतोड केली आहे.हा अपराध आहे, महाभयंकर गुन्हा आहे.त्यांच्या अहंकाराच्या सळसळत्या श्वासाची मुजोरी आपण का सहन करावी.असा सडेतोड प्रश्न करणारे या पृथ्वीला वाचविण्यासाठी धरेचे प्रश्न आपल्या आईची मातृभाषा होऊन प्रश्न जगाला विचारतात आणि 

कवी म्हणतात

 

“सभ्यतेला का पोखरते अवसानी मगरूरी ?”

आपली सभ्यता , संस्कृती आतून पोखरली जातेय.आणि कोणामुळे ! 

,तर धर्मांच्या वर्चस्वामुळे 

,गर्वामुळे.विभूतीपूजेमुळे.

 संस्कृती ही संस्कृती राहत नाही .चातुर्वर्ण्य अवस्थेला संस्कृती म्हणता येत नाही .तिथे विषमत्ताच पोसली जाते.हे कवीला मान्य नाही म्हणून कवी आपल्या धरतीवर प्रदूषण ,पर्यावरणविघातक , ग्लोबल वाॅर्मिंग हे का वाढत आहे? असे प्रश्न निर्माण करून  

कवितेतून साहित्यात मांडले.कारणसाहित्य समाज जागृती करतो ‌.असंख्ख प्रश्नांची रेलचेल मातृभाषा आहेत .

कवी प्रश्नांची मातृभाषा याच कवितेत पूढे म्हणतात.

“हृदयाच्या नभात अश्रू होतात अक्षरे तेव्हा .कवीच मन विश्वपर्यावरण झालं कवीच्या कवितेत बुद्ध गंभीर होतो.बुद्धाच्या डोळ्यात दु:खाच्या धारा वाहत आहेत.बुद्धाचा हदयात अश्रू अंतरीक्ष झाला आहे.

विकासाच्या नावाखाली अंधाधुंद नगरी होत .पण कवी मात्र क्रांतदर्शी होऊन काळाच्या पूढे पाहतो आहे.

 

माय! या कवितेत म्हणतो.!

पश्चात्तापाचं मन,ॠण व्यक्त करणारं काव्य! ,मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला आईचा कष्ट ,त्याग,भूक ,संघर्ष.

यातनेच्या विस्तवात जळणं मुलाला “माय ” आठवतं ,त्या मुलांच्या मुलाच्या लक्षात येत तेव्हा .तो आईच्या त्यागाचा मुकुट परिधान करून युवराजासारखे वाटते.आईच्या मातृत्वात राजा असलेल्या मुलाला आईचा विसर पडत नाही तर . प्रश्नांची मातृभाषा ‘या काव्याची मौलिकता प्रसवते .व आईला नवा जन्म देते. हेच या कवितेचे वैशिष्ट्य आहे..

 

आजकाल मुले आईला विसरली आहेत.तिच्या कष्टांचा, त्यागाचा ,अर्थच समजत नाही.परंतू कवी येथे मात्र आदर्श पेरत मायच्या प्रश्नांची मातृभाषा उगवतात 

,हेच मला खूप भावलं आहे.

कवीच्या 

  लक्षात येते आईने आपल्यासाठी कीती कष्ट सहन केले.हे जाणणार मनच आईच्या चेहरा आरश्यासारखा पाहतो.त्या आरश्यात “माय”-

पण रोज तिळ तिळ मरणारी माय त्याला दिसते ,पण माय मौन राहते तिचं दु:ख ती दाखवतच नाही.

तिच्या मनाच्या आरश्यात कवीला डोकावून पाहता येत नाही .म्हणून होकावून पाहण्याचा दृष्टीक्षेप नसतोच हे मुलाला नंतर कळत . तोपर्यंत वेळ निघून गेली असते.आईच मन कधी कुणाला कळलेच नाही.तिच्या डोळ्यातला सागर भरूनच असतो.तोच सागर .मुलाच्यासाठी कधी लाटा .तर कधी वात्सल्याची भरती होते तर.कधी दु:खाची ओहटी सुखा:दु:खाचे तुफान होऊन येत. तरीही आईच्या मनातला सागर मुलांना दिसतच नाही.कवीने मात्र 

आईची व्यथा अगदी सुक्ष्म सुक्ष्म मांडली आहे.

 *अशी पेटली आग उरी या कवितेत कवी म्हणतात* ,

*अशी उन्मादी बोलू भाषा असण्याला विलग करी वितळावे लोखंडी -क्रौर्य अशी आग पेटली उरी*!”

 

कवी ,म्हणतो मला अशी भाषा बोलायची आहे.जी वेडापिसा आवेश घेऊन येईल.उन्मादी म्हणजे वेगाने झपाटलेला,तीव्र ,प्रखर,ही भाषा गोड गोड वरवरची नको असलेली.तर असण्याला खोटेपणाला ,डोंगराला फाडून टाकणारी !

विलग करणे म्हणजे! अन्याया वर आ,असण्याला डोंगराला,खोट्यास्तुतीला सरळ भिडणारी भाषा मांडतो मी.

कवीच्या उरात छातीत आग पेटली आहे.कोणती आग ? अन्यायाविरुद्ध , जातीयते, राजकारणाची चाललेली खेळी.बेरोजगारी, महागाई, पेपरफुटी, उपवर्गीयकरणं.ही आग शतकाचा उत्तरार्ध जन्माला घालते आहे का.!हा प्रश्न कविला सतावतो म्हणून कवी म्हणतो की लोखंडी क्रौर्यालाही वितळू शकेल एवढी धग माझ्या शब्दात आहे.

 

कवी,आयुष्याचा अशा वळणावर आलेत.जिथे जुन्या आठवणी,जुने भूतकाळ आता संपला आहे.एक भला मोठा आयुष्याचा टप्पा ओलांडला आहे.तरीही र्निवाह्य प्रश्न भविष्याच्या उंबरठ्यावर का येतात ? मौन पाळतो त्यावेळी त्या गप्पाविरहीत आपण स्वच्छ, पारदर्शक विचार का जाणवत नाही?

पृथ्वीला वाचविण्यासाठी माणसे पूढे का येत नाहीत?

 असा खडा सवालच करणारे कवी आहेत.

 

सावित्री ज्योतिबा फुले या कवितेत कवी म्हणतात

“व्यक्तीमत्व तुझे उर्ध्वगतिगामी नैतिकमूल्यांचा मळा

जीवन तुझे नि:संग दूरदृष्टी प्रक्रियेची अग्नीशाळा !”

 

जोतीसावित्रीचा त्याग फक्त दोन ओळीतच व्यक्तिचित्रण केले.

“ऊर्ध्वगतिगामी म्हणजे वरच्या दिशेने जाणारा प्रगती करणारा !असा नैतिकमूल्याचा मळा आहे ,

या शब्दातून त्यांचं प्रगतीशील ,मूल्यांवर आधारित आयुष्य दिसतं.तर नि:संग दुरदृष्टी प्रक्रियेची अग्निशाळा म्हणजे प्रत्येक पावलांवर विस्तवासारख्या दूष्ट माणसानां भेदून मुलीची शाळा चालवणे होय . 

 कवीची कविता ही ज्वालाग्नी होत आजच्या मूलतत्वादी चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरच प्रहार करते . म्हणून 

 सर्जना नितळ दूधाची ..या कवितेत कवी म्हणतात

“भर्त्सित अन्यायाविरुद्ध गर्जना करीत राहिन, आईच्या छातीत सर्जना नितळ दुधाची जोवर “!

 

भर्त्सित म्हणजे, धिक्कारलेल्या, निद्यं, 

मी भर्त्सित होणार नाही, लढणारा भीम सैनिक आहे.मी 

  सिंहासारखा गर्जत राहिन, जोवर आईचे निर्भय,निर्मळ, स्वाभिमानी दुध माझ्या नसानसात वाहत राहीन तोवर मी संघर्ष करीन ,लढत राहीन ! या धिक्कारलेल्या अवस्थेशी;

कारण मी 

.मी बुद्धाला माझ्या सर्वंकष मानतो मी कोणत्याही प्रकारची कर्मकांड करत नाही .मी बुद्धाला नैसर्गिक पर्यावरणाचा सखा मानतो म्हणून 

 तथागत बुद्ध या कवितेत कवी म्हणतात

“वृक्षमित्र तथागताचे आयुष्य व्यापले निसर्गाने

अनावृत आकाशाखाली घटनाचक्र वृक्ष साक्षीने”

 

तथागत म्हणजे .तथाभाषी तथाकारी .जसे बोलणार तसेच वागणार.निसर्गालाच गुरूस्थानी मानून निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचे जीवन व्यापले आहे ‌.जन्म लुम्बिनीवनात शालवृक्षाच्या साक्षीनेच झाला ज्ञानप्राप्ती, बोधीवृक्षाखाली निर्वाण. जगात मान्यता पावलेला पिपंळवृक्ष तसेच प्रत्येक वनस्पतीत औषधाचा शोध लावणारे भैषवगुरू म्हणून त्यांची ओळख आहेच.तसेच कुशीनारा येथे दोन शालवृक्षाच्या मधोमध निर्वाण घेणारे अनावृत म्हणजे मोकळ्या आकाशाखाली .

 

कवी प्रश्नांची मातृभाषा या कवितेत सहचरीला कसे विसणार आहे.म्हणून कवी लिहितात

“नाही लिहित प्रेमगीत गर्द मेघांच्या आडोशात शब्दक्रिडा करीत नाही तूर्त घायाळ हदयात”!

ह्यात कवी प्रियाराधन करत नाही,तर समाजाचं दु:ख मांडतोय.

गर्द मेघांच्या आडोशात म्हणजे काळ्याकुट्ट ढगांच्या मागे लपून निसर्गरम्य वातावरणात कविशब्दक्रिडा करत नाही.म्हणून कवी 

म्हणतो

“दु:ख सांगू शकलो नाही अजून काटा आहे सलत

प्रणाम तुझ्यीया प्रेमाचे सत्य वितळत्या धातुत.”!

मी माझं दुःख अजून पूर्ण सांगू शकलो नाही.ते एका काट्यासारखं आत रुतून सलतंय पण तुझ्या प्रेमाचं खरेपण त्याचा पुरावा आहे .मला त्या वितळत्या धातुसारखा दिसतोय.

धातू वितळला की त्यातली भेसळ ,मळ निघून आणि शुध्द सोनं उरतं.तसेच प्रश्नांची मातृभाषा मध्ये कवी समाजाच्या दु:खाच्या आगीत होरपळून जातोय.पण या आगीत सहचरीच प्रेमच सत्य , शुद्ध,रूप मला दिसतंय ते प्रेमच माझ्या लढ्याला बळ देतंय .‌

 

 

या कविता संग्रहात एकून ५२कविता आहेत कवितेचे मुखपृष्ठ पाहूनच कळते प्रश्नांची मातृभाषा मध्ये आजपर्यंत न कोणी न विचारल्या प्रश्नांची उत्तरे आणि मायेच्या दु:खाची अथांगता मांडली आहे.त्याबरोबर आंबेडकरांनी चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रश्नांची मातृभाषा डोळ्यात असणे व ध्येयवादी होणे किती आवश्यक हेच यात निक्षूनपणे सांगितले आहे.

 

पण कुठे शब्द शब्द विज्ञानशाखेतले मराठी घेतले तर मराठीची शब्दसंग्रह वाढलाच आहे.पण त्याच बरोबर लोकांना सहजपणे लक्षात न येणारे शब्द नवे रूप धारण करून आलेले आहेत.पुढील कवितासंग्रहात बाजूलाच शब्दांचा अर्थ कंसात देतील अशी अपेक्षा करते. आणि हा कविता संग्रह महानशास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांना समर्पित केला आहे ‌त्याबद्ल लेखकांचे कौतुकच..कारण आयझॅक न्यूटन यांना घडविणारी त्यांची आईची होती.म्हणून प्रश्नांची मातृभाषा मध्ये त्यांच्याही आईचा गौरवच झाला‌

या कविता संग्रहाला जागतिक कविम्हणून मान्यता पावलेले जेष्ठ साहित्यिक आंबेडकरी विचारवंत डॉ यशवंत मनोहर सरांची प्रस्तावना व ब्लर्क लाभलेला आहे.

म्हणजे त्यांचे अभिनंदन तसेच 

 

‘माय’:या सर्वहारांच्या सर्वंकश मातृत्वाच्या काव्यात्म आविष्कार या समीक्षात्मक लेखनास डॉ.श्रीपाल सबनीस सरांचे शब्दांकन लाभले आहेत.वाचून अन्वयार्थ जिज्ञासा मिळाली.तसेच शिवा इंगोले याचेही शब्दायण मिळाले..

हा कविता संग्रह प्रत्येक व्यक्तीच्या वाचनात जावा म्हणजे विज्ञानातील शब्द किती चपखलरीतीने कवीने सहजपणे बसविले आहेत . नवीनतम शब्दांचा संग्रह वाढतो..

पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबंते 

 

सुनीता इंगळे ह्या मराठी साहित्यातील लेखिका आहेत.

– सुनीता इंगळे

 मूर्तिजापूर, अकोला 

भ्रमणध्वनी – ७२१८६९४३०५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top