लोकशाहिचा हंबरडा

 

मूलतत्ववादी लोकांनी 

अमानुष्यपणे कत्तल केली लोकशाहीची .समानतेमधून 

उगवणा-या दिशांची‌!

 

राजरोसपणे नाकारतात पूर्व दिशेला ,

अंधाराच्या डोक्याला पूज्य मानून झिंगतात!

 बथानी टोला ,दैवावादी होऊन लोकशाही हंबरडा होते.तेव्हा मूलतत्ववादी हसतात‌!

 

आपल्याच कोषामध्ये 

असतात.

लोकशाहीचा खून

 करणारे

 ‌बेमालूमपणे

 सामाजिक, शैक्षणिक 

आर्थिक सामाजिक, बौद्धिक 

कार्याला जितराबासारखे 

बांधतात खुंटीला.

 पळवतात धड नसलेल्या

 डोक्यांना इथला कर्मठपणा 

धनुष्यबाणासारखा.‌

 

तेव्हा संविधान हतबल होते

.विकले जातात न्यायाचे हात.

  विघातक परिणाम करणा-या घटनांना 

मूलतत्ववादी चिखलातून 

गांडूळ होऊन बाहेर निघतात 

तेव्हा हसतात !

 ती घटना ,

गाईला पूज्य मानणा-या 

धडासारखी नाचते ..

 

तेव्हा लोकशाही हंबरडा 

होते‌

 तेव्हा लोकशाही 

हंबरडा होते

सुनीता इंगळे ह्या मराठी साहित्यातील लेखिका आहेत.

– सुनीता इंगळे 

मूर्तिजापूर (अकोला)

भ्रमणध्वनी – 72186 94305

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top