पड-पड रे पाण्या
माय थकली भागली
काया-काया वावरात
तिनं बीज पांघरली …
ती झाली येडी पिशी
तुवा अंधार पाहून
तू येतं रिमझिम
तिले लागली तहान …
तिची तहान रे मोठी
येणं घोड्यावर बसून
का? बसला आटून
जीव झाला दाना-फान …
असा बरस जोरात
नदी नाले कर एक
फिटेल आमचा रे पांग
तुया एका झरोक्यात …
येणं दिवस रातीले
बी राहील गाभण
भरपूर दे पीकं
फिटीन देशाचं इघन ..
पड-पड रे पाण्या
रान कर हिरवंगार
जीव सुखात जगेल
तुवा राहू दे विहार
***
– देवानंद पवार
छत्रपती संभाजी नगर
बोला : 9158359628