१.
गोड बोलणे
निमित्त संक्रातीचे –
लाडू तिळाचे
२.
खिन्न … उदास …
शुष्क पावसाळ्यात –
हात हातात
३.
घरादारात
पाऊसच पाऊस –
फिटली हौस
४.
चंद्राला ढग
हळू गिळू लागला –
तारा पडला
५.
उरात चिंता
रडतंय तान्हेलं –
दुध आटलं
६.
नुसती आग –
माळ्याच्या सान्निध्यात
गंधीत बाग
७.
निष्पर्ण झाड
पाखरांचा गोंगाट –
भंगला काठ
८.
थांबली कळ
जमा खाली चिखल –
नितळ तळ
९.
देह फुलांनी
सुंदर सजवला –
काढले सोने
१०.
तुडुंब पाणी
मैदानात साचले –
बेडूकगाणी
११.
फुलपाखरू
तिळतिळ उन्हात –
भृंग फुलांत
१२.
भर वैशाख –
साद कुहूँ कुहूँची
देई दिलासा
१३.
पहाटलाली
ओले इंद्रधनुष्य-
नाचला मोर
१४.
बाग गंधीत
फुले टवटवीत –
गान मस्तीत
१५.
मयूर केका –
बिचकले नभात
मेघांचे लोट
१६.
मुसळधार
वर्षा कोसळणारी –
पाहुणा दारी
१७
उदास यात्री –
पाचोळ्यात फुलांच्या
मिळाल्या कळ्या
१८.
रौद्र वादळ
कवितेने उठले –
अक्षर ओले
१९.
रान वाळले
पक्ष्यांची भरे जत्रा –
भुंडे कणीस
२०.
क्षणात रडू
क्षणात हसू आले –
बंध जडले
२१.
शुभ्र चांदणे
नक्षत्र मंडलात-
डाग चंद्रास
२२.
सरली भीती
परिसर देवाचा –
सूर भक्तीचा
२३.
हवाहवासा
शीत पहाटवारा –
गुप्त इशारा
२४.
हळू बोला ना
फूल आता फुलले –
फुटेल गोष्ट
२५.
सोबत आले
भटके वाटसरू –
फुलपाखरू
– तुकाराम पुंडलिक खिल्लारे
परभणी
भ्रमणध्वनी : ८८३०५९९६७५