निसर्गाचा कोप

दशहदतच्या वातावरणात जगता जगता वर्षे निघून गेले,

पोलिसांचा पाहरा, त्यांच्या हातातले दंडे,…

वारंवार हात तोंड धुवा, नाक तोंड झाका,इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, याले हात लावू नका त्याले हात लावू नका,नाही

नाही म्हणून घरात कोंडून घेतले होते स्वतः ला.

लंग्न नाही,पार्टी नाही, हॉली डे नाही, थंड पेय नाही, उरले फक्त घरात राहून घरातील काम, आणि मरणाची भीती होती मनात…

उपास मारीचे दिवस काढले, घरं दारं सोडून मुलांना दुरूनच बाय बाय करू लागले…

डोळ्यात अश्रू घेऊन रुग्णांची सेवा करू लागले…

काहींनी दुरूनच रक्ताच्या नात्याला बाय बाय म्हंटले…

हृदयाच्या नात्याला सुद्धा दुरूनच दिली श्रद्धांजली 

अश्या प्रकारे सर्वावर हार्दिक कोरोना पडला भारी….

सर्व ठीक झाल्यावरही शंकाकुशन्का ने घेतली उंच भरारी…

हे काही नाही निसर्गाचा कोप आहे भाऊसाहेब…

पापाचा भर यव्हढा झाला धरतीवर की याची किंमत तर चुकववीच लागणार ताई साहेब…. 

कवयित्री छाया चक्रनारायण

–छाया चक्रनारायण 

मूर्तिजापूर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top