लाख लाख वंदन तुजला कोटी कोटी वंदन
मानवतेच्या राजा तुजला कोटी कोटी वंदन ||धृ.||
ज्ञानाचे पाणी आम्हाला पाजूनी दयाळा
झालास तू दयेचा सागर तोडूनिया बंधन ||१||
हक्क काय असतो अन् तो कसा मिळवावा
शिकविलेस तू आम्हाला पाळुनिया बंधन ||२||
वाटतो सर्व जगाला तुझ्या कर्तुत्वाचा हेवा
तुझ्या बुद्धी तेजाने आमचे उजळले जीवन ||३||