फुले अन् माळा

त्यांचीच फुले होती

 त्यांच्याच होत्या माळा 

त्यांनीच केला त्यांचा 

सत्कार कित्येक वेळा 

 

पदोपदी घोषणा अन 

उदोउदो जागोजागी 

चेल्याचपाटयांना त्यांचा 

केवढा हा कळवळा 

 

जयंती असो वा पुण्यतिथी 

भाषणे सारखीच त्यांची 

आदरणीय महापुरुषांचा 

त्यांना तसा कायम लळा 

 

जनहितार्थ कार्ये जरी 

कर्तव्य त्यांचे असले तरी 

जनतेवरील उपकाराचा 

प्रत्येक वेळी सोहळा 

 

घात झाला म्हणणारे 

आज ठरती बावळे 

घाम गाळीला कुणी अन 

हिरावला कुणी मळा

………………..

प्रा.धनंजय पटोकार

अकोला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top