मनातील शब्द माझे ओठांवर आले नाहीत,भावनांचे अर्थ माझे कुणाला कळलेचं नाहीत.
सर्वांसाठी झटतो,सर्वांसाठी जगतो, पण माझ्या वेदनांचे सूर कुणाला ऐकवले नाहीत.
हास्याच्या मागे किती अश्रू दडले आहेत, हे जगाला कधीच दाखवले नाही.
स्वप्नांसाठी लढत आहे एकटाच मी,सोबती अनेक आहेत,पण साथ कुणी दिली नाही.
आजही उभा आहे आशेच्या त्या वाटेवर, कारण वेळ बदलते, हे सत्य काही खोटे नाही.
कदाचित आज मला कोणी समजून घेतलं नाही, पण उद्या माझ्या संघर्षाची कहाणी जग नक्कीच विसरणार नाही
– विशाल वानखडे
मूर्तिजापूर (अकोला)
भ्रमणध्वनी – ८३९०३५१४०३