लगीन

असं कसं बा तुले, समजलं काही नाही.

लवकर लगीन करू नको म्हटलं, मायं ऐकलं तू नाही.

नाय नाय म्हणो तरी, केलं मायं लगीन

आता भोगते आहे, संसाररुपी हे इगीन.

नवरा म्हणतो, तू माह्या चपलेची धूळ

आलं माह्या नशिबी, आता चूल आणि मूल

गुलामीनं कसं जखडून टाकलं गं बाई.

बा तू माय लगन करायची का केली घाई.

सासू, ननंदा करतात, मायाच कामाचा हेवा

नाही काम केलं तर नवरा दावतो डोया.

मोठाल्या डोयाचा मले भेव नाही

माय बापाच्या इज्जतीसाठी, सार सोसते ग बाई.

- कांचन मिसाळ(तिडके)     मूर्तिजापूर (अकोला)

 

– कांचन मिसाळ(तिडके)

    मूर्तिजापूर (अकोला)

4 thoughts on “लगीन”

  1. माय बापाच्या इज्जतीसाठी या शब्दातून पिढ्यान पिढ्या स्त्रियांनी शोषलेल्या अन्याय मागचे कारण स्पष्ट झाले

    प्रत्येक स्त्रीने वाचावी अशी कविता.

  2. SHRIYA TAMBADE

    खूप छान मॅडम…खूपच संवेदनशील आणि मनाला भिडणारी कविता…♥️👌🏻

    1. Tushar Radke

      साध्या शब्दांतून खूप मोठी व्यथा मांडली आहे मॅडम, खूप सुंदर कविता आहे.!”

  3. Gopal Uchitkar

    या ” लगीन ” कवितेमधून तुम्ही लगन झालेल्या एका स्त्रिची दयनिय अवस्था खुपच मार्मीक वैदर्भीय बोलीत सादर केली आहे खुपच छान मॅडम. पुढील लेखनाकरिता हार्दिक शुभेच्छा !.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top