बीज

एक छोटसं बीज मातीमध्ये पडलं…

लगेच घाबरलं… थोडसं रडलं…

आता सगळं संपलं असं त्याला वाटलं

गंभीर शांतता काळोख सर्व बाजूला… प्रकाशाला प्रवेश नव्हता…

बीज भयभीत झालं.. निराश झालं

आता सगळं संपलं असं त्याला वाटलं

माती म्हणजे शेवट…माती म्हणजे थांबणं नसतं… तर थोडा वेळ स्वतःसोबत घालवणं असतं हे त्याला 

कळलं नव्हतं..

दिवस चालले पण अजून काहीच घडले नाही… असं त्याला सतत वाटत होतं…

पण कुठेतरी हळुवार बदल सुरू होता… जे तुटल्यासारखं वाटत होतं तेच खरं तर जुळत होतं… जे गमावल्यासारखं वाटत होतं तेच नव्याने सापडत होतं…

बीजेला आता धीर आला स्वतःची मुळे तो ओळखायला लागला…

सगळं लगेच समजेलच असं नाही…

सगळं लगेच दिसेलच असं नाही… हे आता त्याला उमजायला लागलं…

आणि जेव्हा त्याने स्वतःला मातीवर सोपवून दिलं तेव्हा स्वशंकेचं कवच अखेर तडकलं…

आतून आत्मविश्वासाचं कोवळं अंकुर फुटलं…हिरव्या स्वप्नांना आता आकार मिळू लागला…

भयभीत बीज आता निर्भय झाड झालं… कारण जे शेवट वाटलं ते सुरवात ठरलं…जे हरवल्यासारखं वाटलं तेच स्वतः होणं ठरलं…जे गाडलं गेल्या सारखं वाटलं ते तर पेरलं जाणं होतं हे त्याला आता स्पष्ट झालं ….

 – श्रीया तांबडे 

मूर्तिजापूर (अकोला)

6 thoughts on “बीज”

  1. डॉक्टर कांचन मिसाळ (तिडके)

    खूप छान मॅडम

  2. Tushar Radke

    “खूपच सुंदर कविता आहे! बीजाच्या प्रवासातून तुम्ही आयुष्याचं मोठं सत्य सांगितलं आहे. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली नवी सुरुवात होत असते. “जे शेवट वाटलं तीच सुरुवात ठरली… हे वाक्य खूप काही सांगून जातं. प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला कसं घडवावं, याचं हे उत्तम उदाहरण आहे.”

    1. SHRIYA TAMBADE

      तुमच्या सुंदर अभिप्रायासाठी खूप खूप धन्यवाद सर…🙏🏻🙏🏻

  3. Gopal Uchitkar

    Through this ‘Beej’ poem you have conveyed a truly valuable message. For this, I offer you my heartfelt congratulations, along with my best wishes for your future writings. Your hard work is truly evident. May every goal you pursue be realized, and may you attain success in all your endeavors—this is my humble prayer to the Divine.

    1. SHRIYA TAMBADE

      Thank you so much for your kind and beautiful wishes…
      Your encouragement and blessings mean a lot to me and are truly invaluable…🙏🏻🙏🏻🙏🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top