संगत शहाण्याची कर,
मुर्खात काय आहे.
गंध गुलाबाच घे,
तगर फुलात काय आहे.
माणसात शोध देव,
दगडात काय आहे.
आत्मचिंतन कर,
कीर्तनात काय आहे.
संसारात निर्भिड वाग,
कुचराईत काय आहे.
नियती सदा घाव घालील,
दुःखात काय आहे.
कर्णासारखा दानशूर हो,
कवच कुंडलात काय आहे.
मरणाची चिंता कशाला,
विटलेल्या संसारात काय आहे.