हसावे फक्त वेलींनी हसावे फक्त चाफ्यांनी
हसावे फक्त हास्याने लिहावे हास्य पानांनी
कधी आले उरी हासू परी हासून थांबावे
कधी अनिवार होतांना जरा अश्रूंस सांगावे
रडावे जेवढे थोडे मुळी दावू नये डोळा
कधी अश्रूंस वाटे की व्यथांनी व्हायचे गोळा
तरी गाळू नये आसू हसावे फक्त अश्रूंनी
जरी वाटे तरी तेव्हा उरी सांडू नये पाणी
हसावे फक्त तार्यांनी हसावे अंध वार्यांनी
जरी मी हासलो नाही तरी गावीच मुलतानी
हसावे फक्त शब्दांनी कधी होतील ते राख
हसावे तेधवा आसू हसावे थेंब ही लाख
– प्रभाकर सोमकुवर
नागपूर
भ्रमणध्वनी – ९५९५ २५५ ९५२