किती सुंदर अशी ती सुगंधित रातराणी
सत्पसुरात गाती मंजुळ प्रेमाची गाणी
मज मनात दरवळला फुलांचा गंध छान
कशी लांबट,हिरवी,चकचकित तीचे पान
उजेडात राणी मात्र आडोशाला लपून बसली
यामिनी दिसताच कशी हळूच दरवळू लागली
मोहकता वाढविते ती बागेच्या अंगणाची
म्हणूनच तीला म्हणतात राणी फुलं झाडांची