आई, मला मोबाईल नको,
नकोत नुसते व्हिडिओ,
बाहेर जाऊन ऐकायचा आहे,
चिमण्यांचा चिवचिव रेडिओ!
मैदानावर जायचे मला,
चेंडू-फळी खेळायला,
मित्रांसोबत धावून धावून,
खूप खूप हसायला!
कधी उडवेन मी पतंग,
कधी पकडेन फुलपाखरू,
मातीत खेळून मजेत आपण,
हवेसारखे मुक्त फिरू!
डोळे माझे दुखतात ग,
स्क्रीनकडे बघून बघून,
मला आता खेळायचे आहे,
मोकळ्या हवेत बागडून!
म्हणून आई सांगतो तुला,
हातात नको रे फोन;
खऱ्याखुऱ्या या खेळांमध्ये,
रमून जाईल माझे मन!
आई, मला मोबाईल नकोच आहे,
ढगातील प्राणी शोधायचे आहे,
मैदानावर मित्रांसोबत,
मला खूप खूप खेळायचे आहे!
– विजय बेलखेडे
‘साहित्यामूलाग्र’ संपादक