गोड रुसवा

आज ती रुसली,

माझ्या दूर जाऊन बसली

मला कळलंच नाही,

का ती फुगुन बसली. 

 

चोरून चोरून बघायची,

पण काहीच नाही बोलायची 

नाकावरचा राग तिचा,

मला अजूनच घाबरून द्यायची.

 

हिंमत नाही केली मी विचारायची

नाही ती काही सांगायची

आता कळेल कसं मला,

तिच्या मनात हूरहूर कशाची.

 

रागात झाली होती लाल,

माझ्या काळजाचे होत होते हाल

जरी माझ्याशी भांडत होती

पण चिडचिड तिची बघवत नव्हती.

 

जिंदगी आहे माझी ती,

तिच्या प्रेमात आहे वेडा मी

जरी नखरे करणारी ती,

प्रेमाने सगळं सोसणारा मी.

 

शेवटी चूक माझी गृहीत धरून,

माफी तिची मांगीतली 

उठक बैठक काढताना बघून

मनी खुदकन गोड हसली.

 

मनाने गोड मनाला मनवल,

आता काळजी नाही कसली

जी बसली होती रुसून,

आता मनातून हसू लागली.

 

ती गोड,

तीचं रुसणं – फुगणं पण गोड

अजून नाही कळलं मला 

पण नेमका काय झाला घोळ

तुषार रडके

– तुषार रडके 

मूर्तिजापूर 

भ्रमणध्वनी : + 73595 94378

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top