शाळा अन् ते शिक्षक

जीवनात माणूस मोठा होत जातो

पण अखेरपर्यंत त्याला आठवत असते फक्त ती शाळा अन् ते शिक्षक

 

पुन्हा पुन्हा परतावं वाटतं त्याला त्या रम्य दिवसात 

त्या शाळेच्या आवारात अन् त्या शिक्षकाच्या सहवासात

 

तो बनतो मोठा अधिकारी, पदाधिकारी,व्यापारी

पण बालपणीचे गुरुजी दिसताच तो विसरतो सार काही

 

 तो सतत आठवत असतो ते दिवस त्या गोष्टी ती गाणी 

अगदी साठी गाठलेले मित्र भेटतात तेव्हा काढतात फक्त शाळेच्या आठवणी

 

बालपणीचा काळ सुखाचा

या बालपणी वाचलेल्या ओळींचा अर्थ कळतो 

त्याला मोठे झाल्यावर

ते दिवस हातून निघून गेल्यावर

 

जीवनात प्रत्येकाला आठवत असतो त्याला आवडलेला एक शिक्षक

त्यांची शिकवण त्यांचे विचार त्यांचा आचार हेच बनतात त्याचे जीवन रक्षक 

 

सुनील ढोकणे

– सुनील ढोकणे 

शेलूबाजार (मूर्तिजापूर)

भ्रमणध्वनी: 94218 30710

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top