उपेक्षा म्हणजे नाही तिटकारा
उपेक्षा नसतो अपमान
तटस्थपणे पण काळजीपूर्वक पाहणे जरा
उपेक्षा येते करून ध्यान
मैत्री, करुणा मुदिता,उपेक्षा आहेत ब्रह्मविहार
उत्पन्न होणाऱ्या भावनांचा घेतात समाचार
आनंद मिळेल अपरंपार
तत्त्वज्ञानाचा उपेक्षा आहे मूलाधार
उपेक्षा अंगीकारल्यामुळे लाभते समाधान
उपेक्षा या गुणाचे करू किती गुणगान
जीवन समृद्ध आणि झाले आहे छान
प्राप्त झाले आहे निर्वाण
उपेक्षा आहे चांगला गुण
संत मनाची आहे खूण
धारण केला पाहिजे आपणहून
नाहीसे होईल मोठे ऋण
डॉ. रोहित तळवलकर
पुणे
भ्रमणध्वनी: 9870304456