एकदा मीच माझ्या ‘बा’च्या घरी
भिकारी होऊन जाईन म्हणतो अन्
मागेन म्हणतो….
एका तात्पुरत्या पोट भरणाऱ्या
भाकरीपेक्षा आजन्म तेजस्वी ठेवणारी वैचारिक श्रीमंती.
नम्रपूर्वक जाईन म्हणतो एकदा…
विद्यार्थ्यांचे हित शोधण्याऱ्या
अन् सर्व विद्यार्थी समभाव ठेवणाऱ्या
ऋषीगणिक माझ्या गुरूकडे अन् मागेन म्हणतो
विनयपूर्वक या आकाशाला ठेंगणे करण्याइतपत परखड पंख,
समुद्राला पोटात साठवण्याइतपत निर्झर ओंजळ,
नैतिक मूल्याची जोपासना करणारे चारित्र्य
अन् विचारीन भगवंताकडे जाण्याचा रस्ता.
लोटांगण घालीत जाईन म्हणतो
स्वार्थी विश्वाला निस्वार्थाने
चालवणाऱ्या जन्मदात्या भगवंताकडे
अन् मागेन म्हणतो दंडवतपूर्वक
‘तुका’ समजावण्या इतपत बुद्धी,
तुझ्या जगात वावरण्याइतपत शक्ती,
अन् तू मिळवण्यापर्यंतचे संयम.
– स्वमी बोबडे
पैठणकर
Wow !!!!! Thank you dear 👌👌👌👌👌👌