Skip to content
व्यसनाच्या सरी
आल्या माझ्या घरी,
बाप दाद्याची कमाई
वाहून गेली !
आला इतका पूर
धरन झालं घर,
काट्याबरोबर फुले
वाहत चालली !
पळलो कसा फाशात
आलं नाही लक्षात,
पैशाच्या बळावर
नाचत होतो !
पैसे होते तेव्हा
होता माझा मान,
पिळतात कान
आता लहान मोठे !
– सुभाष पुं. डहाणे
माळशेलू (वाशीम)