प्राध्यापक

मला असं वाटतं खूप काही असतं

असूनही नसतं असं खूप काही असतं

देतात आम्हाला काही बिनमागण्याचं

पण त्यांचे काय उपकार ते त्यांचं कर्तव्यच असतं

काही जण म्हणतात ते काय करायचं

गाईड वाचून सगळं परीक्षेत लिहायचं

आपण मात्र कर्तव्यापासून चुकायचं

अन् कॅन्टीनमध्ये बसायचं

असंच काही असतं तेव्हा त्यांना खरं म्हणजे दिसतच नसतं

त्यांना दिसतं ते म्हणजे कटिंगच असतं

काही जण असतात कर्तव्याशी एकनिष्ठ

त्यांच्यावर तर खरं कॉलेज चालत असतं

तेच तर खरे समाज घडविणारे असतात

मुलांना खडखड पढविणारे असतात

कॉलेजच्या ग्रंथालयाचं खूप महत्त्व असतं

असणाऱ्याचंच असतं काहींना ते हसण्याचं ठिकाण असतं

कोंडबा फक्त घेयायचं तेच घ्यायचं

बाकी काही घ्यायचं नसतं!

कोंडबा भ. हाटकर

– कोंडबा भ. हाटकर 

भ्रमणध्वनी – ९५५२१३३९५१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top