फोन लावून लावून मास्तरचं सारं खतम झालं बॅलेन्स
तरी पोट्ट काही भरे ना ऍडमिशनचा फारम
एका एकाले चार चार दा म्हणून मास्तर बेजार लय झाला
ऍडमिशनचा कोटा काही वरे नायी आला
जो तो म्हणे घेतो मी सायन्स
मार्क विचारले तर म्हणे आहे मले बावन
सायन्सवाल्याचा सारा गल्ला फुगून वर आला
आर्ट कॉमर्सचा मास्तर उणीत हिंडून मेला
अर्धा घंटा एका विद्यार्थ्यासाटी घसा कोळ्ळा केला
तई कुठी त्याचा फक्त बाप राजी झाला
पोट्ट म्हणे बापा तुले काही समजत नाई
पीएसआय व्हायले सायन्स शिवाय मार्ग दुसरा नाई
सरकार करते ऑनलाईन
पोट्याले त्यातलं काई समजत नाही
रजिस्ट्रेशन पार्ट-वन, पार्ट-टू चा मेळ त्याले कायी जमत नाही
तारीख गेल्यावर म्हणते मायी ऍडमिशन काहून झाली नाई
विद्यार्थीच झाला लय शहाणा मास्तरलेच ठरवते म्याट
तुमच्याच इथे आलो म्हणून शेवटी देते च्याट
शासनाच्या नवीन धोरणापाई मास्तरची झाली शिकार
ऍडमिशन साठी त्यानं आता कोणता खेळावा जुगार
लोक म्हणतेत मास्तरची उन्हायात मजा आहे भारी
दोन मयने सुट्टीची बात आहे न्यारी
ऍडमिशन पायी मास्तरच्या सुट्टीचा खेळ खंडोबा झाला
मास्तरचा जीव आता लय मेटा कुटीला आला
शयरातल्या कॉलेजचे आता लय लागले कॅम्पस भरू
गावातल्या कॉलेजची झाली पडझड सुरू
ॳशी विद्यार्थी भरा म्हणते एका वर्गामदी
नाहीतर करते सरप्लस करून मास्तरले करते जायबंदी.
-प्रा. मोक्षदा विजय बेलखेडे