उपहार

काळोख होता नशिबी आपल्या 

 दूर दूर सोबतीला कोणीही नव्हतं आपल्या l 

 त्यांनी कधीही अंधार न होणारा प्रकाश दिला l

 बाबासाहेबांचे मानावे किती उपकार 

 संविधानाच्या रूपात अनमोल उपहार भारताच्या स्वाधीन केला l

 शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र सर्वांना दिला l

 डोईवरचा पदर हटवून समानतेचा अधिकार दिला महिलांना l

 डोळ्यामधून कोसळणाऱ्या आसवांना 

 किंमत दिली बाबासाहेबांने 

 जन्मदात्री माय सुद्धा पुसणार नाही अश्रू लेकरांचे 

 जीवन घडविले बा भिमाने आपले त्यांच्या लेखणीने 

 शून्यातून केली सुरुवात अमर झाले सहाही खंडात,

 आंबेडकर असे त्यांचे नाव 

 आपल्या सर्वांचे आहेत ते भीमराव 

सलामी मी त्यांना सदा देत राहिलं स्वाभिमानाने जगणे मला त्यांनीच शिकविले त्यामुळे मी सदैव त्यांच्याच ऋणात नेहमी राहिलं.

कवयित्री छाया चक्रनारायण

– छाया चक्रनारायण 

मूर्तिजापूर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top