तुझ्या विना करमत नाही…..

तीन वर्षांचा काळ सरला, जणू स्वप्नच ते साजिरे,

कधी रेशमी सुखाचे वारे, तर कधी अश्रूंचे काजवे.

हातात हात गुंफून आपण, पार केले कितीतरी टप्पे,

आठवणींच्या कोपऱ्यात सजलेत, आपल्या प्रेमाचे छोटे रोपटे.

कधी कारणाशिवाय तुझं रुसणं, आणि माझं ते मनवणं,

कधी छोट्याश्या गोष्टीवरून, तासनतास ते भांडणं.

रागात तुझं ते गाल फुगवणं, अन् डोळ्यांतलं पाणी,

पण त्या रुसव्यामागेच दडलेली असते, प्रेमाची एक कहाणी.

भांडलो कितीही तरी शेवटी, धागा तुझाच घट्ट असतो,

तुझ्या एका शब्दासाठी, हा जीव मात्र वेडापिसा असतो.

घराच्या भिंतींनाही आता तुझीच ओढ लागते,

तू नसलीस की ही वास्तूही साधी निर्जीव वाटते.

तुझ्या हसण्यानेच या घराला घरपण येतं,

आणि तू शांत असली की काळजाचं पाणी पाणी होतं.

तीन वर्षांच्या या प्रवासात, तू सोबती माझी खास झालीस,

कधी मैत्रीण तर कधी हक्काची, माझी सावली झालीस.

तुझ्यावाचून आता खरंच, क्षणभरही करमत नाही,

तुझ्याशिवाय या आयुष्याला, दुसरी कोणतीच लय नाही.

अशीच राहो सोबत आपली, जन्मी या साथ असू दे,

रुसवे-फुगवे विसरून फक्त, ओठांवर आपल्या हास्य असू दे.

कारण काहीही असो, तुझ्याविना हे जग सुने वाटते,

तुझ्या अस्तित्वातच ‘मोक्षू’, माझं संपूर्ण विश्व साठते.

विजय बेलखेडे 'साहित्यामूलाग्र' मुख्य संपादक

– विजय बेलखेडे 

‘साहित्यामूलाग्र’ संपादक 

7 thoughts on “तुझ्या विना करमत नाही…..”

  1. प्रा. राजेंद्र वाकडे

    सर आपल्या मध्ये खूप मोठी प्रतिभा आहे,
    खरंच खूप खास.
    अगदी कमी शब्दांत आपल्या भावना व्यक्त करण्यात आपला हात खंडा आहे. 🙏👍

  2. Shrikrishna Shamsundar

    जीवनप्रवासातील चढ उतार छान मांडले….

  3. Tushar Radke

    खूप छान कविता आहे सर💐
    तुमच्या मनातल्या भावना कवितेच्या शब्दांतून व्यक्त झालेल्या आहेत.

  4. MOKSHADA ARUN INGOLE

    प्रिय, विजू
    तीन वर्षाच्या या कडू गोड प्रवासातील सुंदर क्षणासाठी खूप खूप धन्यवाद, आणि हो
    आज या क्षणी आठवणीचा मयूर नाचतो तुझ्या सवेच्या क्षण धारांणी मज चिंब भिजवूनी जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top