चला चला रे शाळेला
सारे मिळून जाऊया !
छोट्या मुलांनो शाळेत चला
मोठ्या मुलांनो शाळेत चला
शाळेमध्ये जाऊया
मोठे माणूस होऊया !
आई-बाबांना विनंती आहे
मुलांना शाळेत येऊ द्या !
काका-काकू मामा-मामी
मुलांना शाळेत येऊ दया!
शाळेमध्ये जाऊया
खूप खूप शिकूया!
शाळेमध्ये जाऊया
खूप खूप खेळूया!
शाळेमध्ये जाऊया
मोठे शिकून होऊया!