सावित्रीमाई

 

बाई म्हणजे चूल आणि मूल ही रुढीवादी परंपरा नष्ट केली आमच्यासाठी,

 सराट्या जागी पेन हाती देऊन माई तू किती झटली तुझ्या लेकिंसाठी!

अंगावर गोटे शेण घेऊन तू किती त्रास सोसून घेतला,

 शिक्षण हे फक्त पुरुषांसाठीच आहे हा लिंगभेद तू मोडून काढला!

मुलगी जन्मताच म्हणतात घरात लक्ष्मी आली ,

पण या लक्ष्मीची चार भिंती आतून सुटकेसाठी तूच धावून आली!

स्त्री पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून उंच भरारी घेत आहे,

या समीकरणामुळे देश प्रगतीपथावर जाण्यात तुझा मोठा हात आहे!

इतकी मोठी क्रांती घडवून तू मोडून काढली जुनी विचारसरणी,

 स्त्री जीवनाची उद्धारकरती सावित्रीमाई आमचे मस्तक सदैव तुझ्या चरणी !

      ~डॉ. वेदांती वर्षा जगदेव बरडे

       मूर्तिजापूर (अकोला)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top