मावळत्या दिनकराचा अन् धगधगत्या अग्नीचा
रंग केशरी कृष्णाच्या गीतेचा अन् शरयूतिरी रामराज्याचा
रंग केशरी बुद्धाच्या चिवराचा अन् बोधिरूपी ज्ञानज्योतीचा
रंग केशरी यादवांच्या साम्राज्याचा
अन् देवगिरीच्या गरुडध्वजाचा
रंग केशरी छत्रपती शिवाजीच्या स्वराज्याचा
अन् भद्रकाली ताराबाईच्या पराक्रमाचा
रंग केशरी विद्रोही तुकारामाचा अन्
इंद्रायणीत समाधीस्थ गाथांचा
रंग केशरी जोतिबाच्या सत्यशोधकाचा
अन् सावित्रीच्या काव्यफुलांचा
रंग केशरी भारतमातेच्या झेंड्याचा
अन् रणवीरांच्या शौर्याचा
रंग केशरी गाडगेबाबाच्या विरक्तीचा
अन् दशसूत्रीच्या उपदेशाचा.
प्रा. डॉ .मनीषा यादव
श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर. जि. अकोला.
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कविता…केशरी रंगाचा इतिहास, पराक्रम आणि अध्यात्म इतक्या प्रभावी शब्दांत मांडला आहे की प्रत्येक ओळ अभिमानाने भरून जाते…🚩
कविता बोलत जाते. केशरी रंग स्प्रेरणा देत, राहतो. राष्ट्रीय खरोखर उलगडत राहते; वाचकाला एक लय संगीतमय करून खिळवून ठेवते ती पुढली ओळ…..
On speak poem Very Nice madam, new energy in my life so congrats coming new poem and
The color pink continues to inspire. The national spirit truly unfolds; and the very next line—imbued with a music rhythm—holds the read spell-bounding