मरणाची हाक

पाचीपक्वानाचा वास

साऱ्या गल्लीत घुमते

उपाशी झोपले पोरं

माय खोप्यात लळते!

घागरीतला बी झरा

कसा पाण्याचा आटला

नगारे झाले पोटं

होट नाही अनाले भेटला!

धनिकाच्या डोयात

मावत नायी झोप

गरिबाच्या चोचीत

फक्त भाकरीचा जप!

अशी काहून देली दैवा

तुया गरिबाले भूक

त्या परीस देणं दैवा

आमाले मरणाची हाक!

संपादकीय मंडळ सदस्य - सुभाष पुंडलिक डहाणे

– सुभाष पुंडलिक डहाणे 

  माळशेलू (वाशीम)

  भ्रमणध्वनी – ८४११८१५७४५

2 thoughts on “मरणाची हाक”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top