कधी कधी वाटते मला
तुझ्या डोळ्यातील अश्रू व्हावे,
सरकत सरकत गोऱ्या गाली
ओठांचे ते चुंबन घ्यावे.
कधी कधी वाटते मला
तुझ्या वेणीतील फुल व्हावे,
गंधाचा त्या वर्षाव करुनी
मन तुझे ते चोरून घ्यावे.
कधी कधी वाटते मला
तुझ्या हातातील बिल्लोर व्हावे,
जाग येता सखे तुला
सुख दुःखाचे गीत गावे.
कधी कधी वाटते मला
तुझ्या कपाळाचे कुंकू व्हावे
सात जन्माची नाती गुंफुणी
सदैव तुझा गुलाम व्हावे.
सदैव तुझा गुलाम व्हावे.
– सुभाष पुंडलिक डहाणे
माळशेलू (वाशीम)
अतिशय सुंदर
खूपच छान 👌
समर्पक उपमा, खूप सुंदर.