डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि दलित साहित्य

 

‘दलित साहित्य’ ही संज्ञा आता वाचक- अभ्यासकांना आणि रसिकांना परिचयाची झाली आहे. ‘आंबेडकरवादी’, ‘बौद्ध साहित्य’, असे अनेक नावे त्याला मिळाली. हिणकस, प्रचारी, ऊरबडवे, आक्रस्ताळे, मर्यादित परिघातीले कसे, ‘दलित साहित्य’ ह्या कसोटीला कसे उतरत नाही. अशा अनेक वादळातून तापून सलखून निघाले आहे. आज विविध विद्यापीठात दलित साहित्याचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. 

    देशविदेशात डॉ. भालचंद्र फडके, प्रा. रा. ग. जाधव, दि. के. बेडेकर, प्रा. शरच्चंद्र मुक्तिबोध, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. म. ना. वानखेडे, बाबूराव बागूल, अर्जुन डांगळे यांनी सातत्याने लेखन करून, चळवळ आणि प्रकाशनाच्या माध्यमातून, दलित साहित्याला अनोखेपण प्राप्त करून दिले. 

प्राचीन परंपरा व विविध मते, धर्म, रूढी, तत्त्वज्ञानाने आणि त्यांच्या परस्परपूरकता, विभिन्नता असलेल्या देशात, कोणत्याही गोष्टीला सहसा उगाचच मान्यता मिळाली नाही. तसे घडले तर ते फारच तात्कालिक आणि अल्पकालीन ठरते. महाराष्ट्राच्या मातीत चर्चा चिकित्सा जास्त अशी मानसिकता व परिस्थिती होती. या सर्व अग्नीदिव्यातून दलित साहित्य पडताळून निघाले. त्याची डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव प्रेरणा आहे. 

 हिंदू धर्मातील जातप्रथा, दैव प्रथा, चमत्कार, अवतार, पुनर्जन्म या सारख्या अनेक गोष्टी त बदल व्हावे परंतु तसे घडले नाही. नागपूर येथे धर्मांतर केले. याचा समाज मनावर साहित्य वर प्रभाव जाणवतो. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात धर्म, मानवी इतिहास, संस्कृती, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, जागतिक परिवर्तन, तर्कशास्त्र, स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञान निष्ठा हे त्यांच्या सखोल मूलगामी संशोधनाचे विषय होते. समग्र मानवी कल्याण व वस्तुनिष्ठ वास्तवतेचा आग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सोडला नाही. 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण, देश परदेशातल्या विविध पदव्या त्यांची पत्रकारीता, संपादन, प्रामुख्याने सतत लेखन, सभा,संमेलने, परिषद, चर्चा, मोर्चे, सत्याग्रह, चळवळी, ‘मूकनायक’, बहिष्कृत भारत, जनता, या त्यांच्या नियतकालिकांनी त्यांचे विचार, धोरणे, भूमिका लोकमानसात रुजविण्याची मोलाची कामगिरी केली आहे. 

नवे आंबेडकरी विचारांचे जलसे, तमासे, यातील शाहिरांनी रान पेटवून विचार समाजात मांडला. यात भाऊ फक्कड नावाने लिहिणारे भाऊ मालोजी भंडारे, उमा बटवा, सातू सुबराव,दगडु बाबासाळी, शिवासंभा, अर्जुना वाघोलीकर, भाऊ बापू नारायणगावकर, अशा अनेक लोक कलाकारांनी वगनाट्य, कवनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला समाजात रुजविले आहे. 

 दलित साहित्य ची काव्य परंपरा किसन फागू बनसोड, पतितपावनदास,वामन कर्डक, केरू अर्जुन घेगडे,केरू बुवा गायकवाड, दीनबंधू, अण्णा भाऊ साठे, शाहीर शिवराम भोसले, शाहीर विठ्ठल उमप दलित साहित्यातील आरंभी ची काव्यसृष्टी पाहवयास मिळते. 

केशव मेश्राम, वामन निंबाळकर, दया पवार, ज. वि. पवार, प्रल्हाद चंदवनकर, यशवंत मनोहर, नामदेव ढसाळ, लहू कानडे, हिरा बनसोड, ज्योती लांजेवार यांच्या अस्वस्थ मनाचे प्रत्ययकारी दर्शन दलित कविता मध्ये जाणवते.

कवितांच्या खालोखाल आत्मकथनाने विद्रोह केला. सत्यान्वेषक,जीवनदर्शन, प्रसंग चित्रण, व्यक्ति रेखाटन, समूह भान सहज अनुभवता येत. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे- माधव कोंडविलकर, हकीकत आणि जटायू- केशव मेश्राम, बलुत-दया पवार, आठवणी चे पक्षी, उपरा, उचल्या,अंतस्फोट,माह्या जल्माची चितरकथा,आमचा बाप अन् आम्ही, आयदान ही स्वकथने वैशिष्ट्ये पूर्ण आहेत. 

 कथा लेखनात ना. रा. शेंडे, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, वामन होवाळ, योगीराज वाघमारे, उर्मिला पवार, अर्जुन डांगळे, अविनाश डोळस, रविंद्र हडसनकर नवनवे कथाकार कथेचे दालन समृद्ध करत आहेत. 

कादंबरी मध्ये अण्णाभाऊ साठे,शंकरराव खरात, माधव कोंडविलकर, उत्तम बंडू तुपे, सुखदेव ढाणके,उत्तम कांबळे, शरण कुमार लिंबाळे, भीमसेन देठे, जी. के ऐनापुरे विशेष ताकतीने हाताळणारी नवी पिढी कादंबरी वारसा चालवत आहे. 

नाट्य रंगभूमीवर वर म. भ. चिटणीस ‘युगयात्रा’ भि. भि. शिंदे काळोखाच्या गर्भात,दत्ता भगत-वाटा आडवाटा, प्रेमानंद गज्वी- खेळिया, उ. ब. तुपे,टेक्सास गायकवाड- आम्ही देशाचे मारेकरी , रामनाथ चव्हाण-साक्षीपुरम, बामनवाडा, प्रभाकर दुपारे, जयंत पवार एकांकिका मथ्ये प्रल्हाद जाधव, प्रेमानंद गज्वी नवे वैशिष्ट्ये पूर्ण प्रयोग आढळतात. दलित रंग भूमी मराठी रंगभूमीला विचारात पाडणारी आहे. 

दलित साहित्य अनुभवाच्या मुशीतून साकारले आहे. हा अनुभव माणुसकी, मानवतेला विदीर्ण करणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नवनव्या पिढी माडंतेआहे;परंतु एक मागोवा घेतला आहे. परीपूर्ण नसावा पण वैचारिक चळवळ साहित्य याचा समन्वय यातून कळावा एवढेच. 

सल्लागार मंडळ सदस्य श्रीकृष्ण शामसुंदर

– प्रा. श्रीकृष्ण शामसुंदर

भ्रमणध्वनी – ९९२१४७४०३५

6 thoughts on “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि दलित साहित्य”

  1. manoj kasture

    अभ्यासपूर्ण सखोल,लेखन.अनेक अपरिचित दलित साहित्यकारांविषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

  2. sandip salunkhe

    सर तुमचे लेखन खूपच सुंदर वाटले. तुमचे खोलवर वाचन असल्याची जाणीव होऊन मलाही वाचावे अशी प्रेरणा मिळत आहे आता खरंच वाचावे असे वाटत आहे.

  3. खूपच छान लेखन सादर करण्याचा प्रयत्न आहे. संपादकीय मध्येही आपण उत्कृष्ट लेखन आहे.वाचून आपणाकडून प्रेरणा मिळालेले आहे व खूपच वाचावे असा प्रेरक झालो आहे

  4. Manisha Yadav

    वगनाट्य लिहिणाऱ्या मला अज्ञात असणाऱ्या लोककलाकार यांची नावे माहित झाली .

    छान

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top