बियाणे
कर्ज काढुनिया ।
शेत मी पेरले ।
नाही उगवले ।
सोयाबीन ।।१।।
संकरित वाण ।
वाझोंटे निघाले ।
पोसू चिलेपाले ।
कसे आता ।।२।।
घरचे बियाणे ।
करावे जतन ।
सांगे गजानन ।
सर्व लोका ।।३।।
डॉ.गजानन घोंगटे,वनोजा
मराठी विभाग प्रमुख,
श्रीमती सांळुकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय,वनोजा,जि.वाशीम-४४४४०२
सदस्य, वाणिज्य भाषा अभ्यास मंडळ, संगाबा अमरावती विद्यापीठ
E-mail:ghongategajananb@gmail.com
भ्रमणध्वनी – ९८२२४०६११५