बळीराजा

उत्पादक शेतकरी

मग भाव का ठरवे व्यापारी?

पोशिंदा जर तो या जगाचा

तर मातीसमान अंत का त्याचा?

पोटाची खळगी तर सर्वांनाच आहे

मग धडपड उरी त्याचीच का आहे?

हतबल होऊन विकलेली जमीन त्याची आहे

कर चुकवणाऱ्यांची तर मग मजाच आहे

मातीत घाम, पिकात छदाम न डगमगता लावतो

उभ्या निसर्गाशी राजा उभी पैज लावतो

घरदार, गुरेढोरे, म्हातारे शेतीत नेऊन ठेवतो

राबताना घामाचा घायाळ थेंब उरी शिल्लक राहतो

असे करू, तसे करू सकाळी पिकाला पाहून म्हणतो

अन रात्रीच्या पावसाला कंटाळून जातो

सावकारी पाश, कर्जात न्हाऊन निघतो

प्रत्येक वर्षी लेकीच्या लग्नाचा विचार करतो

नरकयातना जिवंतपणी पाहून मूठ आवळतो

नशिबाच्या रेषा डोळ्यांनी बघतो

विचार घोंघावणारे मग झाडाखाली आणतात

आत्महत्येचे पालवी मनात रुजू लागतात

कंटाळा या जन्माचा, असा आला आता

चोर चालेल पण नका बनवू देवा शेतकरी आता

राजेश नाकट

– राजेश नाकट 

मूर्तिजापूर 

भ्रमणध्वनी –  97636 03312

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top