नशीब

अरे नशीब नशीब

काय भांडत नशिबाले

तुया हातात दम नाही

काय सांगत लोकायले !

नशिबाचा खेव

तुया खेवलाका कवा

दोन्ही हात राबव

तवा मिळते मेवा !

उगा नशीब करू करू

क्षण वाया नोको घालू

लाचारीचा राक्षस जायल

तुया गया दाबून !

तवा म्हणतील लोक

आयतं खाऊ गेला 

कायी लोक म्हणतील

नशीब करू करू मेला !

संपादकीय मंडळ सदस्य - सुभाष पुंडलिक डहाणे

– सुभाष पुं. डहाणे 

माळशेलू (वाशीम)

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top