हाय विठोबा..!
वारी चुकू नये शतकांची
म्हणून यायचं दर्शनाला
की शोषित, पिडीत, वंचित
दीनदुबळ्यांचं दुर्दैव
सुदैवात परिवर्तित करण्यासाठी
आपल्या काष्ठवत पायांनी
पायपिट करत,
ऊन पाऊस झेलत,
हाल अपेष्टा सोसत,
यायचं तुझ्या दर्शनाला?
कृषिवलांचा विश्वास आहे तुझ्यावर अजून
ज्ञाना, तुक्या, चोखा, एका
नामा, सावता, गोरा, बंका
तू पाहिलेस सर्वांचे सत्व
देऊन संतपदाचे तख़्त
– सुशील केकान
छत्रपती संभाजीनगर
भ्रमणध्वनी – 9665979131