व्याप

सोसता सोसवेना

संसाराचा व्याप

रिकामे ते माप

आयुष्याचे !

 

आंधळ्या डोळ्यात

आशेचा किरण

रोजचे मरण

जगण्यासाठी !

 

बरी नाही काही

धनाची रे नशा

लोपेल ती आशा

माती पोटी !

 

संपादकीय मंडळ सदस्य - सुभाष पुंडलिक डहाणे

सुभाष पुं. डहाणे 

माळशेलू (वाशीम)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top