जीवन जगणे आहे एक कला
कित्येकांना व्हायचे असते त्यात निपुण
पण एवढं सहज-सोपं नसतं
त्यासाठी घ्यावं लागतं स्वतःला त्याच झोकून
झोकून देताना मात्र—
होणाऱ्या यातनेचा विचार नक्की करावा
नाही जरी आले यश पदरात
तरी धीर मात्र तेवढा उरावा.
पण,
स्पर्धेच्या ह्या युगात जगता जगता
नशीबाने एवढा का मारावा डंख?
की काहीच नाही उरते त्याच्यापाठी
असतीने छाटावे त्याचे पंख
पंख छाटताना मात्र—
एवढा विचार देवाने नक्की करावा
पुन्हा भरारी घेण्यास
त्यात प्राणमात्र तेवढा ठेवावा…
म्हणूनच वाटायला लागते
उधार मिळेल का कुठे,
जीवन जगण्याचे तंत्र
कुणीतरी का होईना…
देऊन जावा आयुष्याचा मंत्र
मंत्र देताना मात्र,
त्याचा प्रभाव इतका असावा
उरलेल्या आयुष्यात,
घेतलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप नसावा.
आता,
हा प्रवास आहे तुझा,
तुझा तुलाच पूर्ण करायचा
काहीही होऊ दे
पण कधी विचार नको करू मरायचा…
मरण येताना मात्र,
त्याचा आवाका एवढा असावा,
तुझ्याएवढा कितीवंत तुच झालेला असावा.
— साईप्रसाद रामकिसन नेव्हल
चंद्रपूर, महाराष्ट्र.
भ्रमणध्वनी – 8485020367